कुणाला भेटली साधी जगायाची उपाधी ही ..
तुला भेटेन मी आता जगाच्या पायथ्याशी ही.!
मनाचे कोणते हेतू मनाला मी कसे दावू ,
मनाचा हाच गाभारा इथे आहे उपाशी ही ..!
ज्ञानदीप सागर ...
"स्वप्न स्नेहल"
Thursday, March 8, 2012
Tuesday, February 14, 2012
----सात वर्षे ----
माझा एक छोटे खाणी
पुस्तक प्रकाशित झाल
आणि त्या दिवशी
मी खूप रडलो
..रडलो म्हणजे.. खरच डोळ्यातून पाणी
आवरेनासे झाले होते..
त्या दिवशी डोळे पुसायला ना आईचा पदर होता .
ना तुझी ओढणी ..
मी रडत होतो..
माझे पुस्तक रडत होते,,
सर्व काही रडल्या सारके ..पण
उगाच रडण्याचा कोणी तरी बहाणा करत होत
तेही माझ्या हृदयाच्या जवळ ...
माझे चुकलेले ठोके..
घड्याळाचे काटे
ते फिरणार चाक
मुस्मुस्णारे नाक .. सारे टिपत होते .
कोणी तरी होते .. माझ्या अवती भवती, मला पाहणार
पण तरीही मी रडत होतो..
का ?
तुला ठावूक असेल
त्या दिवशी ..
तू हरवली होतीस. ..
नाही ,मीच हरवलो होतो..
तुझ्या पासून...माझा हात
एकमेकांच्या हातातून .. वेगळा झाला
आणि बस्स पापणी बंद करून कधी सात वर्षे उलटली कळलेच नाही .
ज्ञानदीप सागर ....
पुस्तक प्रकाशित झाल
आणि त्या दिवशी
मी खूप रडलो
..रडलो म्हणजे.. खरच डोळ्यातून पाणी
आवरेनासे झाले होते..
त्या दिवशी डोळे पुसायला ना आईचा पदर होता .
ना तुझी ओढणी ..
मी रडत होतो..
माझे पुस्तक रडत होते,,
सर्व काही रडल्या सारके ..पण
उगाच रडण्याचा कोणी तरी बहाणा करत होत
तेही माझ्या हृदयाच्या जवळ ...
माझे चुकलेले ठोके..
घड्याळाचे काटे
ते फिरणार चाक
मुस्मुस्णारे नाक .. सारे टिपत होते .
कोणी तरी होते .. माझ्या अवती भवती, मला पाहणार
पण तरीही मी रडत होतो..
का ?
तुला ठावूक असेल
त्या दिवशी ..
तू हरवली होतीस. ..
नाही ,मीच हरवलो होतो..
तुझ्या पासून...माझा हात
एकमेकांच्या हातातून .. वेगळा झाला
आणि बस्स पापणी बंद करून कधी सात वर्षे उलटली कळलेच नाही .
ज्ञानदीप सागर ....
Thursday, February 9, 2012
---- पाऊस ----
फ़क़्त पाऊस .
तुझी आठवण क्षणो क्षणी येत असते
पण पाऊस आला कि
ती अजूनच तीव्र होत जाते .
पाण्याचे थेंब
कौलांवरून टपटपून जाताना तुझा भास
होत असतो मनाला
अश्याच एका पाऊस रात्री
आपण भेटलो होतो
त्या वडाच्या झाडा खाली ...
मी पूर्ण भिजलो होतो .अगदी चिंब झालो होतो
तू छत्री घेवून मागाहून आलीस .
थोडा धक्का मारून गेलीस
माझ्या तोंडून येSSSSS
शब्द येताच चक्क हसून पुढे झालसी
म्हणालीस (येतो का माझ्या बरोबर . भिजण्या पेक्ष्या बर आहे )
तेच शब्द अजून थंडगार करतात मला
घर जास्त लांब नव्हत पण पाऊस खूप होता
जास्त भिजायची तरी कुणाला हौस
म्हणून शिरलो तुझ्या छत्रीत
थंडगार मौसमात सुद्धा
तुझ्या असण्याने मला उब मिळत होती
त्याच उबेचा पाऊस ..आज मला हवा आहे
आज .. तुझा सहवास मला हवा आहे
अश्या पावसात भिजण्यासाठी तरी माझ्या बरोबर
येशील का ?
वाटसरुने वाट अडवावी ,
विचारावे ..तू आज एकटाच ?
त्या वेळी मना मध्ये एकच प्रश्न येतो
काश .तू आज माझ्या बरोबर असली असतीस तर ...
कोणताही बहाणा मिळो..
फ़क़्त तुलाच भेटण्यासाठी तुझ्या
घराची वाट पकडतोय .आणि चुकलेल्या रस्त्या वरती
हृदयामध्ये एक स्वप्न घेवून तुझ्या भेटी साठी
तहानलेल्या अवस्थेत ..तुला हाका मारतोय.
तू ये .. मला रस्ता दाखवायला तरी ये ...
कुठे हरवली आहेस ?
आज तू असली असती तर मी माझ्या ठिकाणी पोहचलो असतो
तू येशील मला भरोसा आहे .. म्हणू अजून हाका मारतोय..
वेड्यासारख्या
..
ज्ञानदीप सागर....
तुझी आठवण क्षणो क्षणी येत असते
पण पाऊस आला कि
ती अजूनच तीव्र होत जाते .
पाण्याचे थेंब
कौलांवरून टपटपून जाताना तुझा भास
होत असतो मनाला
अश्याच एका पाऊस रात्री
आपण भेटलो होतो
त्या वडाच्या झाडा खाली ...
मी पूर्ण भिजलो होतो .अगदी चिंब झालो होतो
तू छत्री घेवून मागाहून आलीस .
थोडा धक्का मारून गेलीस
माझ्या तोंडून येSSSSS
शब्द येताच चक्क हसून पुढे झालसी
म्हणालीस (येतो का माझ्या बरोबर . भिजण्या पेक्ष्या बर आहे )
तेच शब्द अजून थंडगार करतात मला
घर जास्त लांब नव्हत पण पाऊस खूप होता
जास्त भिजायची तरी कुणाला हौस
म्हणून शिरलो तुझ्या छत्रीत
थंडगार मौसमात सुद्धा
तुझ्या असण्याने मला उब मिळत होती
त्याच उबेचा पाऊस ..आज मला हवा आहे
आज .. तुझा सहवास मला हवा आहे
अश्या पावसात भिजण्यासाठी तरी माझ्या बरोबर
येशील का ?
वाटसरुने वाट अडवावी ,
विचारावे ..तू आज एकटाच ?
त्या वेळी मना मध्ये एकच प्रश्न येतो
काश .तू आज माझ्या बरोबर असली असतीस तर ...
कोणताही बहाणा मिळो..
फ़क़्त तुलाच भेटण्यासाठी तुझ्या
घराची वाट पकडतोय .आणि चुकलेल्या रस्त्या वरती
हृदयामध्ये एक स्वप्न घेवून तुझ्या भेटी साठी
तहानलेल्या अवस्थेत ..तुला हाका मारतोय.
तू ये .. मला रस्ता दाखवायला तरी ये ...
कुठे हरवली आहेस ?
आज तू असली असती तर मी माझ्या ठिकाणी पोहचलो असतो
तू येशील मला भरोसा आहे .. म्हणू अजून हाका मारतोय..
वेड्यासारख्या
..
ज्ञानदीप सागर....
Saturday, February 4, 2012
---- तुझी आठवण ----
सतत तुझी आठवण येते.मनात चक्र फिरू लागत..
दिवस जातो कसा बसा मन रात्री जागच राहत..
डोक थोड थंड व्हावं म्हणून बाहेर जाव म्हणतो..
तुझ्या सकट प्रेमानेही मनात माझ्या ~हाव म्हणतो..
बाहेर जातो पहातो काय .थंड गार वारा सुटलाय..
बाहेर जातो पहातो काय .थंड गार वारा सुटलाय..
हृदया मध्ये तसाच माझ्या तुझा एक काटा रुतलाय..
थोडा पुढे जातो तर एक झाड खाली वाकलय..
झाडा आड तुझ्या सारख वाटलं कोणी लपलय..
असा भास होतो आता होते तुझी आठवण..
असा भास होतो आता होते तुझी आठवण..
फिरत राहतो तुला पाहत मन करतंय वणवण..
काही असो थोडा प्रवास तुझ्या साठी करतो..
तुझ्या प्रेमा साठी राणी आतून थोडा थोडा झुरतो..
आतून थोडा थोडा झुरतो ...
ज्ञानदीप पाटील..
( स्वप्नस्नेहल ) ४/३/२०१२
दिवस जातो कसा बसा मन रात्री जागच राहत..
डोक थोड थंड व्हावं म्हणून बाहेर जाव म्हणतो..
तुझ्या सकट प्रेमानेही मनात माझ्या ~हाव म्हणतो..
बाहेर जातो पहातो काय .थंड गार वारा सुटलाय..
बाहेर जातो पहातो काय .थंड गार वारा सुटलाय..
हृदया मध्ये तसाच माझ्या तुझा एक काटा रुतलाय..
थोडा पुढे जातो तर एक झाड खाली वाकलय..
झाडा आड तुझ्या सारख वाटलं कोणी लपलय..
असा भास होतो आता होते तुझी आठवण..
असा भास होतो आता होते तुझी आठवण..
फिरत राहतो तुला पाहत मन करतंय वणवण..
काही असो थोडा प्रवास तुझ्या साठी करतो..
तुझ्या प्रेमा साठी राणी आतून थोडा थोडा झुरतो..
आतून थोडा थोडा झुरतो ...
ज्ञानदीप पाटील..
( स्वप्नस्नेहल ) ४/३/२०१२
Friday, February 3, 2012
---- धड़क ----
मी उधाणलेल्या
वा~या सारखा
तुझ्या मागे पुढे
फिरत होतो
तू जात होतीस ..
बाजारातून .
माझ्या ही नकळत
एक गोष्ट घडली
तू मला धडकली..
मी sorry म्हणण्या अगोदर
माझ्या वर भडकली...
तेव्हाच मी तुझ्या
प्रेमात पडलो
प्रेम कसलं तर
धडकलेल्या भेटीच ..
आणि पुन्हा पुन्हा
तुझ्या भेटी साठी
तुला धडक द्यावीशी वाटते
एक चमक खोल
कुठे तरी अंतरात
चमकावी वाटते
तुझ्या माझ्या अश्या भेटीच
गूढ़ रहस्य मी
जाणून होतो
तू माझीच आहेस
असे मी मानून होतो ..
तुझा .
ज्ञानदीप सागर ....
( स्वप्न स्नेहल )३/२/१२
वा~या सारखा
तुझ्या मागे पुढे
फिरत होतो
तू जात होतीस ..
बाजारातून .
माझ्या ही नकळत
एक गोष्ट घडली
तू मला धडकली..
मी sorry म्हणण्या अगोदर
माझ्या वर भडकली...
तेव्हाच मी तुझ्या
प्रेमात पडलो
प्रेम कसलं तर
धडकलेल्या भेटीच ..
आणि पुन्हा पुन्हा
तुझ्या भेटी साठी
तुला धडक द्यावीशी वाटते
एक चमक खोल
कुठे तरी अंतरात
चमकावी वाटते
तुझ्या माझ्या अश्या भेटीच
गूढ़ रहस्य मी
जाणून होतो
तू माझीच आहेस
असे मी मानून होतो ..
तुझा .
ज्ञानदीप सागर ....
( स्वप्न स्नेहल )३/२/१२
---- सुरवात ----
असाच कुढत कुढत
जगण्या पेक्ष्या मेलेलं बर
आणि मरण्या पेक्ष्या काहीतरी
करून मेलेलं बर
तुझा विचार करत करत
तुझ्या स्मृतींना उजाळा देईन
कधी तरी ,कधीतरी का होईना
तुला असेच मिठीत घेईन..
या आशेने जगतोय...
तुला माझ्या स्वप्नात बघतोय.
जे घडलाय ,बिघडलय
ते सर्व जावू दे
मला तुझ्या स्वप्नात
पुन्हा सारखे राहुदे..
मला तुझ्या स्वप्नात
पुन्हा सारखे राहुदे..
ज्ञानदीप सागर ..
(स्वप्न स्नेहल ..)३/२/१२
जगण्या पेक्ष्या मेलेलं बर
आणि मरण्या पेक्ष्या काहीतरी
करून मेलेलं बर
तुझा विचार करत करत
तुझ्या स्मृतींना उजाळा देईन
कधी तरी ,कधीतरी का होईना
तुला असेच मिठीत घेईन..
या आशेने जगतोय...
तुला माझ्या स्वप्नात बघतोय.
जे घडलाय ,बिघडलय
ते सर्व जावू दे
मला तुझ्या स्वप्नात
पुन्हा सारखे राहुदे..
मला तुझ्या स्वप्नात
पुन्हा सारखे राहुदे..
ज्ञानदीप सागर ..
(स्वप्न स्नेहल ..)३/२/१२
Subscribe to:
Comments (Atom)